चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.



◾लोकाधीकार/ शब्बीर पठाण 
जालना दि.१३
जालना शहरात कोविड19 या महामारीचा वाढता प्रादुर्भाव विचारात  घेऊन नगर पालिकेने शहरातील विविध आरोग्य केंद्र तसेच शाळा आदी ठिकाणी नागरिकांचे स्वॕब नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.



 तसेच आज प्रभाग क्र 9 चंदनझिरा  मध्ये नगरसेविका श्रीमती मालनबाई तुकारामजी दाभाडे यांनी स्वतःची स्वॕब टेस्ट करून नागरिकांचे मनोबल वाढवले.सध्या ज्या नागरीकांना आरोग्यासंबंधी काही त्रास जाणवत असेल, आशा नागरीकांनी शिबिराच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी करून घेणे. तसेच कोरोना च्या तपासणीसाठी नागरीकांनी घाबरून न जाता स्वताः पुढाकार घ्यावा, जेणेकरून आपण स्वतःच्या आरोग्या सोबत ईतरांच्या आरोग्याची सुध्दा काळजी घेतली पाहिजे. असे नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी नागरीकांना अवाहन केले. त्यांच्या अवाहनास नागरीकांनी भरभरून प्रतिसाद देत  तब्बल 42 नागरिकांनी स्वतः पुढे येऊन स्वॕब टेस्ट करून घेतले.


 या वेळी डॉ. अनिकेत ओहोळे, अमोल पेरकर, अनिस शेख, यांनी स्वॕब नमुने टेस्ट घेतले. या वेळी नगरसेवक तथा न.प. चे गटनेते गणेश शेठ राऊत ,राधाकिसन दाभाडे , आकाश दाभाडे ,प्रभाकर पवार, अक्षय मोरे, पल्लवी जोशी( ANA) अंगणवाडी सेविका अश्विनी कांबळे, सिमा विधाते, कविता इंगोले, रेणुका जाधव, सिमा मुखेदल, सरस्वती खरात, संगीता दणके, देवकी पठाडे, सिमा कोठळे, वंदना मेटकर, लिला वरगणे, वखरे लक्ष्मी आदींची या वेळी उपस्थिती होती.


 तसेच यावेळी वार्ड क्रं. 9 च्या नगरसेविका मालनबाई दाभाडे यांच्या वतीने कोरोना स्वॕब तपासणी साठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सॕनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.


Popular posts
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
संचारबंदीचे ऊल्लंघन करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सदर बाजार पोलीसांची कारवाई.
Image
प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व मुस्लिम तेली परिषदेच्यावतीने बॅंकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप 
Image