कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली



जालना: प्रतिनिधी,


जालना शहरात कोवीड१९या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरात राहावे आणि सुरक्षित राहावे हा संदेश देण्यासाठी रविवारी (ता.१२) जुना जालना विभागात नगरसेवक आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
    जालना शहरात कोवीड१९या महामारीचा फैलाव वाढत आहे,हा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी सोमवारपासून  जालना शहरात दहा दिवसाची जनसंचारबंदी लागू केली आहे.या जनसंचारबंदीच्या काळात नागरिकांनी घरात राहावे आणि सुरक्षित राहावे हा संदेश देण्यासाठी कदिम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या संयुक्त मोटारसायकल रॅलीचे नियोजन केले होते.कदिम जालना पोलिस ठाण्यातून निघालेली ही रॅली संजयनगर,मिल्लतनगर, दुःखीनगर,मोरंडी मोहल्ला, कुरेशी मोहल्ला,जामा मशीद,माळीपुरा,कसबा, गांधी चमन,मस्तगड,मधुबन काॅलनी,इन्कमटॅक्स काॅलनी‌ भागात जाऊन नूतन वसाहत येथे विसर्जित झाली.



   या मोटारसायकल रॅलीत पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह नगरसेवक शाह आलमखान,अरुण मगरे, विनोद रत्नपारखे,ज्ञानेश्वर ढोबळे,विजय पवार,आमेर पाशा,महेश निकम, शशिकांत घुगे, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते वाजेदखान,संजय देठे,अमजदखान,सुनिल पवार,रवि जगदाळे, पोलिस कर्मचारी कैलास जावळे, सोमनाथ लहामगे, राणोजी पांढरे,संजय गवई,दीपक पवार, नंदकिशोर ढाकणे आदी सहभागी झाले होते.


Popular posts
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मिळणार सेवा पुस्तिका पडताळणीस विलंब होत असल्याकारणाने शासनाचा निर्णय
Image
अंगणवाडी सेविका आरोग्यकर्मचारी यांच्या मार्फत हकीम मोहल्ला,टटूपुरा,या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे
Image
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
संचारबंदीचे ऊल्लंघन करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सदर बाजार पोलीसांची कारवाई.
Image
प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व मुस्लिम तेली परिषदेच्यावतीने बॅंकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप 
Image