बदनापूर/प्रतिनिधी
कोरोना पार्शवभूमीवर प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व मुस्लिम तेली परिषदेच्यावतीने बदनापूर येथील महाराष्ट्र बॅंक, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, केनरा बॅंक, आडीबीआय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण यांनी वाटप केले.
कोरोना महामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सिनेटायझरचा वापर नियमित करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असून, या रोगाशी लढा देण्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असतांना जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सामाजिक व पत्रकार संघटना पुढे सरसावली असून, संघटनेचेवतीने अकरमखान पठाण यांनी बदनापूर तालुक्यातील बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप केले.
यावेळी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण, महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे सरचिटणीस मिर्झा तन्वीर बेग, उपाध्यक्ष मिर्झा अहेमद बेग, अय्युबखान पठाण, जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रफीक अली, जेष्ठ सय्यद नजाकत, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन मिर्झा शहेजाद बेग, शेख मोबीन, शेख अजहर, आरेफखा पठाण आदी उपस्थित होते.