जालना (प्रतिनिधी)
जालना शहरातील कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने सोमवारपासून सुरू झालेल्या कडक लॉक डाऊन च्या काळात प्रभाग क्रमांक 25(ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत705 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
जालना शहरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने सोमवारपासून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शहरात दहा दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे या काळात आरोग्य पथकाकडून नागरिकांचे सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते .त्या अनुसार सहा जुलै सोमवार पासून आठवड्याभरात प्रभाग क्रमांक 25 (ब )इंदिरा नगर, वृंदावन कॉलनी व कचेरी रोड भागात आरोग्य पथकाकडून नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने घरातील एकूण सदस्य, 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब श्वसन संस्थेच्या आजार, किडनी आजार ,कर्करोग, सर्दी ताप खोकला आजार असलेल्यांची माहिती देण्यात आल़ी.या भागातील व्सकतींचेआतापर्यंत स्वॉब टेस्टींगचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे.मोबाईल मध्ये प्रत्येकाने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याची सूचना करण्यात आली.
या आरोग्य सर्वेक्षण मध्ये नगरसेवक लक्ष्मीकांत मनोहर पांगरकर यांचे सहकार्य लाभले आरोग्य पथकात पर्यवेक्षिका एस. बी. देवगिरे ,मुख्याध्यापिका अख्तर जहाँ कुरैशी ,आशा वर्कर वंदना दाभाडे, अंगणवाडी ताई वंदना बोबडे आदींचा समावेश होता.
कोरुना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे स्टीकर प्रत्येक घरावर लावण्यात आले. एकंदर जालना शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.